मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाची आठवण पुन्हा आता मराठा समाजाकडून केली जात आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आणि आता जनतेमध्ये पुन्हा असंतोष वाढायला लागला आहे. सध्याचं महाविकासआघाडी सरकार आरक्षणाचा पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात कमी पडलंय का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
मराठा समाज आता राज्यात आक्रमक होत असून अनेक ठिकाणी निदर्शने व आंदोलने केली जात आहे, तर कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सर्व मराठा संघटना यात सामील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला चांगलेच लक्ष्य केले आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी देखील आज ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. ” जवळपास ३/४ दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार हे स्पष्ट करत नाहीये. आम्हाला अशोक चव्हाण यांचा कामाचा अनुभव आहे ते कधीच कुठलेही काम वेळेत करू शकत नाही व पूर्णत्वास नेऊ शकत नाही.. त्यावर मुख्यमंत्र्याचं काम शून्य. ह्यांना झटका द्यावाच लागेल.” असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
जवळपास ३/४ दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार हे स्पष्ट करत नाहीये. आम्हाला अशोक चव्हाण यांचा कामाचा अनुभव आहे ते कधीच कुठलेही काम वेळेत करू शकत नाही व पूर्णत्वास नेऊ शकत नाही.. त्यावर मुख्यमंत्र्याचं काम शून्य. ह्यांना झटका द्यावाच लागेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 15, 2020
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान मोदी यांना एकत्रितपणे निवेदन द्यावे, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. संभाजीराजेंनी यासंदर्भात सर्व खासदारांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. यामध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे संभाजीराजे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, सदाभाऊ खोतांचा केंद्राला इशारा
- ‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानास आजपासून अहमदनगर जिल्ह्यात प्रारंभ
- #IPL : डेक्कन चार्जर्स ते सनरायझर्स हैद्राबादचा एक विलक्षण प्रवास…..!
- रेकॉर्ड ब्रेक… अहमदनगर जिल्ह्यात काल दिवसभरात १३६६ नवे कोरोना बाधित रुग्ण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

