Share

शिवसेना घेतेय कर्जमाफीचे श्रेय ; ‘पोस्टरबाजी’मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा उल्लेखही नाही

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या कर्जमाफीचे श्रेय मात्र शिवसेना एकटीच घेत असून, बुधवारी (ता. 25) शहरभर करून दाखविले’ असे पोस्टर शिवसेनेतर्फे लावण्यात आले. या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री या दोघांचेच छायाचित्र असून, कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गायब आहेत हे विशेष.

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपचा वाद विकोपाला गेल्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना झाली व शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. या सरकारचा किमान कार्यक्रमही ठरविण्यात आला. त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय अग्रस्थानी होता. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली.

या निर्णयाचे शिवसैनिकांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडून केले तर दुसरीकडे भाजपने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती त्याचे काय झाले? असा प्रश्न करून शिवसेनेला टार्गेट केले. दरम्यान आता कर्जमाफीचे श्रेय फक्त एकटी शिवसेनाच घेत असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. शिवसेनेतर्फे शहरभर करून दाखवले’ असे पोस्टर लावले आहेत.

या पोस्टरवर गोर गरीब शेतकऱ्यांना पीक कर्जावर रुपये दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमुक्ती करून दाखवलं’ असा मजकूर असून, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचेच छायाचित्र आहे, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची छायाचित्र सोडच नावेही नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!