मुंबई:- यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत आल्यापासून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये चकमक सुरू आहे. यूपीएचा भाग नसतानाही शिवसेनेनं यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाचं स्वागत केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे. शिवसेनेनं यात पडू नये, असंही काही नेत्यांनी सुनावलं आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.
राय यांच्या या पत्रामुळे आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याचा रोखच या पत्राचा असल्याने काँग्रेस नेत्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्हं निर्माण होत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. विश्वबंधू राय हे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रिय एनसीबी, ती आली आहे आपण कधी कॉल कराल?’ सचिन सावंतांचा कंगनाला टोला
- राज्यातील तरूण वैफल्यग्रस्त, त्यामुळे तातडीने भरती प्रक्रिया सुरु करा; नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष


