🕒 1 min read
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या मुद्यावरील चर्चेची ही सहावी फेरी असेल.
या संदर्भात केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पत्र लिहून त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव, हवेची गुणवत्ता आणि वीजपुरवठा या मुद्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल.
दरम्यान,शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. आज शेतकरी आणि केंद्र सरकार दरम्यान पुन्हा चर्चा होणार असून या चर्चेपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. मोदी सरकारचे असत्याचे प्रयोग सुरूच असून शेतकरी त्यावर विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात रिपाइंचे 50 लाख सदस्य करा; रामदास आठवलेंचे कार्यकर्त्यांना आदेश
- महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये- भाजपा
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- गृहनिर्माण संस्थांसाठी १ जानेवारीपासून मानीव अभिहस्तांतरणाची विशेष मोहीम – बाळासाहेब पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
