Share

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी, शिवसेना खासदाराचे पत्र

Published On: 

उस्मानाबाद : जिल्ह्यासह मराठवाड्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाही, त्यात नवीन संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तात्काळ निधी देण्याची मागणी शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रात खासदारांनी लिहिले की, ‘माझ्या धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद, कळंब, वाशी, भूम, परंडा, तुळजापूर, उमरगा, लोहारा, लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या सर्व क्षेत्रामध्ये सर्वात मोठया प्रमाणात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्यामुळे बहुतेक भाग जलमय झाला आहे. आपणांस माहिती आहे की, दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी  ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात १८० मि.मी. मुसळधार पाऊसाची नोंद झाली आहे. या परिस्थितीची चाचणी घेण्यासाठी तातडीच्या स्वरूपात केंद्रीय पथक पाठविण्याची आवश्यकता आहे.’

तसेच खासदार राजेनिंबाळकर यांनी लिहिले की, ‘या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील खरिप पिकांचे (सोयाबीन, उडीद, मूग, तूर), गावांत पाणी शिरल्याने घरांची पडझड तसेच जनावरे वाहून जाणे असे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी तात्काळ NDRF अंतर्गत निधी देण्यात यावी. व पिक विमा, महसूल, कृषी विभागाने पिकांचे पंचनामे स्वीकारल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिक विमा मंजूर करून तात्काळ रक्कम द्यावी.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!