मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातही पाऊस होत आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेकांना स्थलांतरित करण्यात आलं. तसेच, वीज पडण्यासह पुराच्या पाण्यात वाहून जाण्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गावंच्या गावं पाण्याखाली गेल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर, जनावरं वाहून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. तर, जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. यामुळे यंदा अस्मानी संकटाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर आमचाही नाइलाज होईल; जयंत पाटलांनी शिवसेना आणि काँग्रेसला दिला थेट इशारा
- ‘भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर ईडी कारवाई करणार का?’, जयंत पाटलांचे आव्हान
- ‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं’
- ‘शिव भोजन थाळी योजनेत मोठा भ्रष्टाचार; फुकटची थाळी खाणारे महाविकास आघाडीचेच कार्यकर्ते’
- शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा – बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
