Share

मुंबईच्या वैभवात भर घालू शकणाऱ्या वरळी किल्ल्याचे होणार सुशोभीकरण

Published On: 

मुंबई  : वरळी किल्ला सुशोभीकरण व संवर्धनाबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. मुंबई महापालिका, राज्य पुरातत्व संचालनालय आणि पर्यटन विभाग यांच्यामार्फत यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना ठाकरे यांनी यावेळी केली.

बैठकीस माजी राज्यमंत्री सचिन अहीर, माजी आमदार सुनिल शिंदे, नगरसेविका हेमांगी वरळीकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

किल्ल्याचे जतन, संवर्धन करणे तसेच किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या अनुषंगाने त्यावर प्रकाशझोत टाकणे (illumination) आदी कामांसाठी दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महापालिका आणि राज्य पुरातत्व संचालनालयामार्फत ही कामे करण्यात येतील. यासंदर्भात पाठपुरावा करुन हा प्रस्ताव मान्य करणे तसेच त्याप्रमाणे किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणाची कामे करण्यात यावीत, अशा सूचना मंत्री  ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या वैभवात भर घालू शकणाऱ्या वरळी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. याअनुषंगाने जेट्टी तयार करुन वांद्रे ते वरळी किल्ला बोटसफरही सुरु करता येईल. यातून स्थानिकांना, मच्छिमारांना रोजगार देता येऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या :-

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!