Share

राज्यमार्गाच्या ठेक्यावरून शिवसेना आमदाराच्या पुतण्याला शिवीगाळ, कारवर दगडफेक

Published On: 

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राज्यमार्ग तयार करण्याच्या ठेक्यावरून शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांचे पुतणे समीर वसंतराव पाटील यांच्या वाहनावर जमावाने दगडफेक करून शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजता जळगावात बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर घडली.

समीर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी पारोळा तालुक्यातील राज्यमार्गाची निविदा उघडणार होती. ही निविदा समीर यांच्यासह सचिन पी. सनेर यांनी भरली होती. त्यासाठी समीर हे त्यांच्या चारचाकीने (क्रमांक एएमच १९, बीयू- ३३००) जळगाव येथीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गुरुवारी आले होते. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जळगाव येथील राहुल शांताराम सोनवणे याच्यासह सात ते आठ जणांचा जमाव समीर यांच्या गाडीसमोर आला. त्यांनी चारही बाजूंनी गाडीवर लाथा मारून शिवीगाळ केली. गाडीवर दगड फेकल्याने काच फुटली.

यावेळी राहुल याने समीर यांना अश्लील शिवीगाळ केली. खिशातून फायटर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर समीर हे गाडीच्या खाली न उतरता चालकास सांगून गाडी तेथून काढून एसपी ऑफिसकडे नेण्यास सांगितले. त्यानंतर राहुल सानेवणे याने सनेर यांना फोन करून पुन्हा समीर यांना शिवीगाळ केली. समीरने कशी काय निविदा भरली, मी त्याला पाहून घेईल असे सांगत पुन्हा शिवीगाळ केली. या संवादाची क्लिप समीर यांनी पोलिसांत सादर केली आहे. याप्रकरणी समीर पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल सोनवणेंसह सात ते आठ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!