🕒 1 min read
पंढरपूर: राज्यातील ठाकरे सरकारमध्ये शिवसेना आमदारही (Shivsena MLA) समाधानी नाहीत याची चर्चा अनेकवेळा होत असते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. शिवसेनेच्या आमदाराने सरकारला घरचा आहेर दाखवला आहे. पंढरपूर येथे एका कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांनी शिवसेनेवर चांगलीच टीका केली आहे. त्यानंतर त्यांनी सरकारला निरोप दिला आहे.
शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) हे सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत. पंढरपूर येथील डॉ. बी.पी. रोंगे हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी भाजप खासदार रणजित निंबाळकर, भाजप आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
शहाजी बापू पाटील म्हणाले, या सरकारमध्ये आम्हाला कोण खाईल किंवा आमचा कोणी विचार करील असे वाटत नाही असे सांगताना घर की मुर्गी दाल बराबर आहे, अशा शब्दात स्वतःच्याच पक्षाला टोले लगावले. तसेच मात्र तालुक्यात शिवसेनेची केवळ ११०० मते असूनही मी आमदार झालो असे सांगताना भाजपची साथ होती म्हणून मी आमदार झालो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- सिंधुताईंची अपूर्ण इच्छा होणार पुर्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली दखल
- ‘मविआ सरकारला पोटापेक्षा आणि शिक्षणापेक्षा नशा महत्त्वाची आहे’; चंद्रकांत पाटलांची टीका
- नाला झालेल्या खामचे रुपांतर पुन्हा एकदा नदीत होत आहे- अंबादास दानवे
- सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर पेडणेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…
- औरंगाबाद-बीड रोडवर ‘एसटी-ट्रक’चा भीषण अपघात; १५ जख्मी, चार जणांचा जागीच मृत्यू..!

