Share

सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर पेडणेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व महाविद्यालये आता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच परीक्षाही ऑनलाईन घेण्यात येणार आहे. असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी जाहिर केले आहे. यावर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी टीका केली आहे. महाभकास आघाडीला ‘क्लास पेक्षा ग्लास’ महत्वाचा, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. दरम्यान, सदाभाऊ यांच्या टीकेवर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी उत्तर दिले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना पेडणेकर म्हणाल्या की,’सदाभाऊ खोत आणि माझी फारशी ओळख नाही. बार आणि शाळा यांचे साम्य दाखवणे ते अत्यंत मूर्खपणाचे लक्षण आहे. इतर राज्यांमध्ये जी नियमावली आहे, तीच महाराष्ट्रात असून Who च्या गाईडलाईननुसार एसोपी ठरतो. परत जुन्या कढीला उत आला आहे’, असे पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, याविषयी ट्विट करत सदाभाऊ खोत म्हणाले आहेत की,’शाळा बंद आणि बार सुरू म्हणजे या महाभकास आघाडी सरकारला “क्लास पेक्षा ग्लास” महत्त्वाचा वाटतो.वाह रे वाह ठाकरे सरकार’, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!