Share

तुमचा सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव या महाराष्ट्राने, देशाने पाहिलाय; उद्धव ठाकरेंचा पवारांवर घणाघाती आरोप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘भाजप-शिवसेनेला घालविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे शरद पवार सांगताहेत, हो तुम्ही स्वस्थ बसू नका, आम्हीही तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही. तुमचा सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव या महाराष्ट्राने, देशाने पाहिला आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, वसंतदादा, अटलबिहारी वाजपेयी यांची सरकारे पाडून तुम्ही ते दाखवून दिले, अशा शब्दात ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा समाचार घेतला. ते औरंगाबाद मध्ये बोलत होते.

दरम्यान, पुढे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे, असे ठाकरे म्हणाले.

‘शहरात अनेक प्रश्न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते महागात पडेल,’ असे ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182507945453477889?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182507352487944192?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182505835299143681?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!