सातारा : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवबंधन सोडत अखेर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येवून दीड वर्ष होत आले, तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडविलेले नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बैठकीबाबत वेळ मागूनही ते भेटत नाहीत. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलं.
नरेंद्र पाटील यांनी लोकसभेची निवडणूक सातारा मतदार संघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती आज माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी शिवसेनेत राहू नये अशीच पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याने आपण नाईलाजास्तव शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप नगरसेविका आणि पालिका अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नात कोरोना नियमांना केराची टोपली
- परमबीर सिंग पाठोपाठ अजून एका आयपीएस अधिकाऱ्याची सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव
- बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण
- प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांना कोरोनाची लागण
- ममता बॅनर्जी यांनी 10 वर्षात बंगालला कंगाल केले – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

