मुंबई : मागील काही दिवसामध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या यादीत कार्तिक आर्यनचे नाव देखील सामाविष्ट करण्यात आले आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.
प्लसचे चिन्ह असलेला फोटो शेअर करत कार्तिकने लिहीले आहे की, पॉझिटिव्ह झालो, माझ्यासाठी प्रार्थना करा.’ त्याच्या या पोस्टनंतर लगेच चाहत्यांनी लगेच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. दोन दिवसापुर्वी कार्तिक ह अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. या शो मध्ये कार्तिकने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला सूट घातला होता. कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने कार्तिकच्या चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आलेले आहे.
कार्तिककडे सध्या भुलभुलैया २, दोस्ताना २ हे दोन मोठे चित्रपट आहेत. यात भुलभुलैयाच्या सेटवर त्याने तब्बू आणि कियारासोबत काम करतानाचे फोटो शेअर केले होते. तर दोस्ताना २ मध्ये जान्हवी कपूर ही कार्तिकची सहअभिनेत्री आहे. तर त्याचा ‘धमाका’ हा आगामी चित्रपट नेटप्लीक्सवर प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का?, थोड्याच वेळात होणार स्पष्ट
- रुपालीताईंनी पूजा चव्हाण प्रकरणात पुण्यात राहुनही चकार शब्दही का काढला नाही ?
- कहाणी में ट्विस्ट, जप्त केलेली ‘ती’ गाडी फडणवीसांच्या ‘गुडबुक्स’मधल्या बिल्डरची; राष्ट्रवादीचा आरोप
- ‘कोण होणार करोडपती’च्या यंदाच्या हंगामाचे सचिन खेडेकर करणार सूत्रसंचालन
- प्रसिद्ध शास्यीय गायक महेश काळे यांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

