Share

परमबीर सिंग पाठोपाठ अजून एका आयपीएस अधिकाऱ्याची सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदली विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अजून एका आयपीएस अधिकारी उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये बदली केलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे हे मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.

सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस दलात काही फेरबदल करून काही आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली गेली आहे. सर्वात वरिष्ठ असूनही पोलीस महासंचालकपदी नियुक्ती न केल्याने संजय पांडे यांनी राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठता डावल्याने आता संजय पांडे राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समोर आले आहे.

संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. संजय पांडे महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी उचलबांगडी केल्यानंतर मुंबईचे आयुक्तपद रिक्त झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी असलेले हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी नियुक्त करण्यात आले आणि महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती केली.

तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली. या बदलीनंतर संजय पांडे यांच्या तुलनेने त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याला महासंचालक नेमण्यात आले. रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. यामुळे संजय पांडे नाराज झाले असून आपल्यावर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आता संजय पांडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

 

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!