Share

‘पुरुष असशील तर राजीनामा दे’ ; निलेश राणेंच आदित्य ठाकरेंना खुले आव्हान

Published On: 

मुंबई : युवासेना अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर एका मोठ्या प्रकरणावरून गेले अनेक दिवस संशय घेतला जात आहे. यात त्यांचे नाव प्रत्यक्षपणे जरी समोर येत नसले तरी नेत्यांच्या टीकेचा रोख आदित्य ठाकरेंवर असलेला दिसून आला आहे. आता, भाजप नेते निलेश राणे यांनी अतिशय बोचरे ट्विट करून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय चौकशीवरून भाजपने राज्य सरकारवर टीकेचे सत्र सुरु केले होते, तर सीबीआय चौकशी केली गेली तर अनेक बड्या व्यक्तींची नावे या प्रकरणी उलगडू शकतात त्यामुळे मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात असून तपासासाठी वेळ घालवण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत होते.

पूरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी, भोजन व आरोग्य व्यवस्था प्राधान्याने करा, वडेट्टीवारांचे निर्देश

यानंतर आता, आदित्य ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केले जात आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अकाऊंटवर मंत्रीपदाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. तर, हा उल्लेख आताच्या परिस्थितीमध्ये काढून टाकण्यात आल्याची टीका देखील व्हायरल होत होती.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले असून ट्विटरद्वारे अतिशय बोचरे ट्विट केले आहे. ” शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही… खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो. ” असे ट्विट करत त्यांनी घणाघात केला आहे. यावर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे देखील महत्वाचं आहे.

ईम्तीयाज जलीलांनी धार्मिक स्थळं उघडण्यासाठीचे आंदोलन मागे घ्यावे-मुस्लिम धर्मगुरूंचं आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!