टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकी बरोबरचं साताऱ्यात लोकसभेच्या पोट निवडणूकीचाही निकाल उद्या जाहीर होणार आहे. लोकसभेनंतर तीन महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात आलेले उदयनराजे भोसले यांच्या अडचणी वाढ झाली असल्याचं बोलल जात आहे. खुद्द शिवसेना नेते संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या निकालाबाबत शंका व्यक्त केली आहे.
राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांत उदयनराजेंनी राजीनामा दिला. राजीनामा देऊन त्यांनी सातारच्या जनतेवर पुन्हा निवडणूक लादली आहे. याचा निश्चित परिणाम मतदानावर होणार आहे. अवघ्या 3 महिन्यांत असं काय झालं की त्यांचं ह्रदयपरिवर्तन झालं, असा प्रश्न लोकांना पडला असेल. त्यामुळे मी ही निवडणूक जिंकेलच असं उदयनराजे आज स्पष्टपणे सांगू शकणार नाही, अशी शंका राऊत यांनी व्यक्त केली आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावेळी उदयनराजे भोसले यांना भरीव यश मिळाले होते. मात्र तीन महिन्यातचं उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सातारच्या जनतेला पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले. मात्र यावेळी सातारकर पुन्हा उदयनराजे भोसले यांना संधी देणार का हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे. पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्रीनिवास पाटील या अनुभवी नेत्याला निवडणुकीच्या उतरवल आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1186917356041199616?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186917048770646016?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

