औरंगाबाद : मराठवाडा संपर्क नेते तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) हे दोन दिवस लातूर-बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक व संघटनात्मक बांधणी याबाबत ११ ठिकाणी बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये महाविकास आघाडी, जागा वाटप तसेच अनेक स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा करण्यात येईल. यावेळी सर्व पदाधिकार्यांची उपस्थिती राहणार आहे.
गुरुवार, १६ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता चाकूर, ११:३० वाजता चापोली, दुपारी १ वाजता जळकोट, २ वाजता उदगीर, ४ वाजता देवणी, ६ वाजता शिरूर अनंतपाळ, सायंकाळी ८ वाजता लातूर येथे बैठका होणार असून लातूर येथे भव्य प्रवेश सोहळा होणार आहे.
बीड जिल्ह्यातील शुक्रवार, १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता केज, १२ वाजता वडवणी, दुपारी २ वाजता शिरूर कासार, ४ वाजता पाटोदा, सायंकाळी ६ वाजता आष्टी, सायंकाळी ८ वाजता बीड येथे बैठक होणार आहे.
या सर्व बैठकीस संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व सर्व अंगीकृत आघाडीच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद विभागातून आज धावल्या ४० बसेस; कर्मचारी संपावर ठाम
- राहुल गांधींची गळाभेट घेत राऊत म्हणाले, ‘आप आये बहार आयी’
- घटस्फोटानंतर १६ वर्षांनी लहान असलेल्या अमृताशी बांधली गाठ; जाणून घ्या कोण आहे ‘तो’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला

