Share

शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर – संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सरकार स्थापण्याची पहिली संधी त्यांनाच आहे. जर भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही, तर शिवसेना सरकार स्थापन करेल. शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर असून, आमच्याकडे शिवसेनेला पाठिंबा देणारी पत्र आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजपामध्ये सत्तावाटपासाठी घमासान सुरु आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असून, भाजपने मात्र ही मागणी स्पष्टपणे धुडकावून लावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर काय तोडगा निघणार यावर अद्यापही गुलदस्त्यात आहे.

शिवसेनेची बाजू लावून धरणाऱ्या राऊत यांनी मुलाखतीत धक्कादायक दावे केले आहेत. ”राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते सोबत घेतले तरीही त्यांचे १०५ आमदार निवडून आले आहेत. सभागृहात १४५चा आकडा सिद्ध करण्यासाठी भाजपकदे ईडी आहे. आज ते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहे. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली पाहिजे, ” असं राऊत म्हणाले.

दरम्यान, भाजपाला सरकार स्थापन करणं जमलं नाही, तर शिवसेना १४५चा आकडा सिद्ध करून सरकार बनवू शकते. सरकार स्थापन करण्याची आमची तयारी पूर्ण झाली आहे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या अनेक नेत्यांची पत्र आमच्याकडं आहेत. जर भाजप सरकार स्थापन करू शकले नाही तर आम्ही राज्यपालांची भेट घेऊ आणि पाठिंब्यांची पत्र दाखवून सरकार स्थापन करू शकतो.” असा दावा राऊत यांनी या मुलाखतीत केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1190597125081423872?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190598760578998272?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!