औरंगाबाद : राज्यात युती तुटल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतही बदल होईल अशी अपेक्षा होती, मात्र यांचा कुठे सुत जुळले कुठे नाही. औरंगाबाद जिल्ह्यात 9 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीत जिल्ह्यात शिवसेनेले बाजी मारली आहे. 9 पैकी पाच पंचायत समितीच्या सभापतीपदावर शिवसेनेचे शिलेदार विराजमान झाले आहे. तर भाजपला 3 व कॉंग्रेसला एक सभापती मिळाला आहे.
जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, पैठण, सिल्लोड, सोयगांव, कन्नड, वैजापूर, गंगापूर व खुलताबाद या नऊ पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणुका घेण्यात आल्या. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर झालेल्या या स्थानिक निवडणुकीत जिल्ह्यातील आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकी मध्ये सध्याच्या राजकीय समीकरणानुसार बदल होईल असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही.
सोयगाव, सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर या पाच पंचायतीचा सभापती शिवसेनेचा झाला आहे. तर सोयगाव,पैठण, सिल्लोड, गंगापूर, औरंगाबाद या पाच पंचायत समितीचे उपसभापती पद राखले. भाजपने हर्षवर्धन जाधवच्या माध्यमातून कन्नड पंचायत समिती ताब्यात ठेवली. दुसरी फुलंब्री आणि खुलताबाद या ठिकाणी भाजपचा सभापती झाला. तर कन्नड आणि फुलंब्री येथे भाजपचा उपसभापती झाला आहे.
पैठण पंचायत समितीमध्ये शिवसेनेने सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे आपल्याकडे कायम राखण्यात कॅबीनेट मंत्री संदीपान भुमरे यांना यश आले आहे. अशोक भवर यांची सभापती तर कृष्णा भुमरे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. अशाच पद्धतीने सिल्लोड आणि सोयगाव दोन्ही पंचायत समित्याची सभापती व उपसभापती पदासह जिंकत वर्चस्व सिद्ध केले. सिल्लोड पंचायत समितीच्या सभापतीपदी कल्पना जामकर, उपसभापतीपदी काकासाहेब राकडे निवड करण्यात आली. तर सोयगांव पंचायत समितीच्या सभापतीपदी रस्तूल बी उस्मान खान पठाण, तर उपसभापती पदी सोहबराव जंगलू गायकवाड निवड झाली. तर आमदार हरिभाऊ बागडे व आमदार प्रशांत बंब यांच्यामूळे फुलंब्री आणि खुलताबाद पंचायत समिती ताब्यात ठेवण्यात यश आले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

