Share

मुंबईला विभाजित करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे- आशिष शेलार

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग:- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

राजकीय पक्षांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसल्याने राजकीय वातावरण देखील तापत आहे. अशातच काँग्रेसचे नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दोन महापालिका आयुक्तांच्या नेमणुकीची मागणी केली आहे.

पालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचं आहे, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.

अस्लम शेख यांच्या मागणीनंतर, हा मुंबईच्या विभाजनाचा डाव असल्याचा आरोप भाजपाच्या नेतेमंडळींकडून करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनासोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे, असा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!