औरंगाबाद : शिवसेनेचे सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुख अहमद यांनी केलाय. ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने वंचित आणि बहुजन समाजाच्या मतांचा जिवावर आज पर्यंत सत्ता मिळवली. मात्र, या समाजाकडे त्यांनी कायमच दुर्लक्ष केले. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणतात. पण त्यांच्या जीवावर आज राज्यामध्ये विरुद्ध विचारसरणी असलेल्या सरकार काम करते. त्यामुळे त्यांना आता धर्मनिरपेक्ष म्हणता येणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या याच भूमिकेमुळे समाजातील वंचित घटक हा वंचित बहुजन आघाडी आकर्षित होत आहे. या घटकाला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबादमधील पालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्यात येणार असल्याचे पक्षाचे निवडणूक निरीक्षक फारुख अहमद यांनी स्पष्ट केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादमध्ये वंचितची ताकद वाढली, मिलिंद दाभाडे यांचा प्रवेश
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
-
‘धनंजय मुंडेंनी मुलांसोबत भेट घालून दिली नाही तर आमरण उपोषणाला बसणार, परवानगी द्या’
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र

