Share

सरकार स्थापनेसाठी शिवसेना कोणतीही अडसर निर्माण करत नाही : संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि रामदास कदम यांनी आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार स्थापनेत शिवसेना कुठेही अडथळा ठरत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राऊत म्हणाले की, आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने राज्यपालांना भेटलो. ही आमची सदिच्छा भेट होती. या भेटीत बाळासाहेब ठाकरे यांचे फटकारे हे पुस्तक तसेच उद्धव ठाकरे यांची पाहावा विठ्ठल व गडकिल्ल्यांबाबतचे पुस्तक राज्यपालांना भेट दिले.

या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हायला हवं, असे शिवसेनेला वाटत असल्याची बाब आम्ही राज्यपालांपुढे ठेवल्याचेही राऊत म्हणाले. सरकार स्थापन व्हायला का उशीर होतोय हे माहीत नाही मात्र सरकार स्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडसर नसल्याचेही आम्ही राज्यपालांना सांगितल्याचे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1191334614347812870?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191328920634658816?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191323112802926592?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!