🕒 1 min read
मुंबई- सुशांत सिंह मृत्यू प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणात योग्य तपास करणाऱया मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले होते. सोशल मीडियावर तब्बल 80 हजार किंवा त्यापेक्षाही जास्त बोगस खाती उघडून त्याद्वारे पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यात आली असल्याचे आता सांगण्यात येत आहे.
बिनबुडाचे आरोप, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही डगमगलो नाही. आता या बोगस अकाऊंट खोलणाऱयांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करू, असे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठणकावले आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल केले असून बोगस खाती बनविणाऱ्यांचा कसून शोध सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई नक्की केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
दरम्यान, आता या प्रकरणी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा वापर राजकरणासाठीच केल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची बदनामी करण्यासाठी उघडण्यात आलेल्या सोशल मिडियावरील बनावट अकाउंटचा लवकरच तपास होऊन सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले.
एम्सनेदेखील सुशांत सिंहची हत्या नसून आत्महत्या असल्याचे सांगितल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजपूत मते मिळवण्यासाठी हे राजकारण केले गेले असा आरोप अनिल परब यांनी केला. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे राज्याचे नेतृत्व केले. पण सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱयांचा बिहारमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस प्रचार करणार का, असा प्रश्न त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :-
- खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस
- टाळेबंदीपूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच आता गाडी सुटण्याच्या 30 मिनिटे अगोदर मिळणार दुसरी आरक्षण यादी
- मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा
- रस्त्यावर फिरून वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांच्या मदतीला धावले मोदी सरकार
- जाणून घ्या मोदींनी गेल्या सहा वर्षात खरच पिकांच्या किमान हमी भावात टप्याटप्याने वाढ केली का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
