Share

Samana । अलिबाबा व चाळीस चोरांची बाजू कायद्याने व नीतीने खरी असती तर…; उद्धव ठाकरेंचा सामानातून घणाघात

Published On: 

Samana । मुंबई : शिवसेनेच्या सामानाच्या अग्रलेखातून नेहमीच विरोधकांवर टीका करण्यात येते. मात्र २०१९ नंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यावर त्यांना सामानाच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक म्हणून काम बघत होत्या. दरम्यान, शुक्रवारपासून पुन्हा एकदा सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानंतर आज पहिला अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामानाच्या आजच्या अग्रलेखात ?

कोणाला रोखता येणार नाही. पुन्हा 8 ऑगस्टला न्यायालयात सत्य व इमानदारीचाच विजय होईल. आजही न्यायालयात काही रामशास्त्री आहेत व त्यांनी न्यायाचा तराजू समतोल राखण्याचे राष्ट्रकार्य बजावले आहे. मुळात अलिबाबा व चाळीस चोरांची बाजू कायद्याने व नीतीने खरी असती तर एव्हाना संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असता. शपथविधी नाही व शिंदे-फडणवीसांच्या फक्त दिल्ली वाऱ्याच सुरू आहेत. गुरुवारी तर उपमुख्यमंत्री फडणवीस एकटेच दिल्लीला गेले. इकडे मुख्यमंत्री शिंदे अचानक आजारी पडले.

एकतर शिंदे यांना दिल्लीची हवा मानवत नाही किंवा महाराष्ट्राची हवा पुन्हा बिघडली असल्याने शिंदे यांना गुदमरल्यासारखे झाले असावे. लग्न झाल्यावर पाळणा हलला नाही की लोक संशयाने पाहतात व दांपत्यास अनेक सल्ले देतात. शिंदे यांच्याबाबत तेच सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची वरमाला बळेबळे गळय़ात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्ष सोडला नाही तर पक्षांतर बंदी का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना शिंदे यांचेच डोके ठणकत राहील व एक दिवस त्यांना त्या डोक्यावरचे केस उपटत बसावे लागेल.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी ‘स्ट्रेचर’ व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो!

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!