Share

पदरात जास्त पाडून घ्यायचं असेल तर शिवसेना आपल्या भूमिकेत बदल करते- चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. यावरून भाजपने शिवसेनेला हिंदुत्वावरून निशाण्यावर धरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी भाजपने मात्र टीका करणे सोडले नाहीये.आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही सेनेवर निशाणा साधला आहे.

“शिवसेना ज्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेली, त्याच दिवशी संपली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा शरद पवार आणि सोनिया गांधींवर टीका केली, परंतु त्याच पक्षांशी शिवसेनेने आज जुळवून घेतले. आज जरी एमआयएमला शिवसेना विरोध करत असली तरी, पदरात जास्त पाडून घ्यायचं असेल तर शिवसेना आपल्या भूमिकेत बदल करते.”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान एमआयएमच्या ऑफरवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. असे उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!