Share

रत्नागिरीत दुकानं बंद करण्यासाठी शिवसेना आक्रमक; व्यापाऱ्यांशी केली बाचाबाची

Published On: 

रत्नागिरी : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बदंची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस हे तीनही पक्ष बंदमध्ये सहभागी झाले आहेत. राज्यभरात हा बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. राज्यभरात अनेक व्यापारी वर्गाने या बंदला पाठिंबा दर्शवत दुकाने बंद ठेवली. रत्नागिरीमध्ये देखील दुकाने बंद ठेवण्यात आली असून काही दुकाने उघडली ठेवल्याने शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत व इतर ठिकाणी दुकाने बंद होती काही ठिकाणी किरकोळ स्वरुपात दुकाने व खाद्यपदार्थाच्या हातगाड्या उघड्या होत्या. एसटी महामंडळने आपली वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू ठेवली आहे लांब पल्ल्याच्या गाड्याही नियोजित वेळेत सोडण्यात आले आहेत. रिक्षा वाहतूक काही प्रमाणात चालू आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवेला वगळल्याने दूध, अंडी यांचीही वाहतूक सुरळीत सुरू होती. हे पाहता दुकानदारांनी बंद न करण्याची भूमिका घेतल्याने वाद झाल्याचे दिसले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील क्रूर शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व आरोपींना पाठीशी घालणा-या भाजप सरकारविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!