Share

औरंगाबादेत धडकणार शिवसंवाद मोहीम; वॉर्डावॉर्डात होणार संघटनात्मक बांधणी..!

Published On: 

औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackrey) यांच्या जन्मदिनानिमित्त औरंगाबाद शिवसेनेच्या शाखेच्या वतीने जिल्ह्यात १५ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai), शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant khaire), संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर(Vinod Ghosalkar) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या मोहिमेत तालुक्यात गाव पातळीवर व शहरात वाॅर्ड स्तरावर संघटनात्मक बांधणी त्याचप्रमाणे विकासात्मक दृष्टीकोनातून विविध विकास कामे या विषयी चर्चा, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी सांगितले आहे.

या शिवसंवाद मोहिमेच्या अंतर्गत आमदार अंबादास दानवे तसेच आमदार संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली २१ जानेवारी रोजी पश्चिम मतदारसंघात शहर व ग्रामीण तालुक्यात सकाळी ९:३० वाजता उपशहरप्रमुख अंबादास मस्के व किशोर कछवाह यांच्या कार्यक्षेत्रातील विभागाची बैठक सत्संग हॉल, मीरानगर, पडेगाव याठिकाणी, स. ११:०० वाजता वंजारवाडी, दु.१२:३० वाजता गिरणेरा, दु.४:०० वाजता वसंत शर्मा, सतीश निकम, राजू राजपूत, संजय बारवाल, संतोष मरमट यांच्या कार्यक्षेत्रातील विभागाची बैठक वेदांत हॉल वेदांतनगर या ठिकाणी होणार आहे.

तर सायंकाळी ५:३० वाजता उपशहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, रमेश बहुले यांच्या कार्यक्षेत्रातील विभागाची बैठक बाळासाहेब ठाकरे सभागृह, स्व.मीनाताई ठाकरे नगर सातारा परिसर याठिकाणी सायंकाळी ७:०० वाजता उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, अनिल मुळे, संजय पवार, रतन साबळे यांच्या कार्यक्षेत्रातील विभागाची बैठक ब्राह्मण समाज मंगल कार्यालय याठिकाणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!