औरंगाबाद : कोरोनामुळे औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागताच लॉकडाऊननंतर केव्हाही औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये शिवसेनेला आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मनसेने मोठा धक्का दिला आहे. खैरे यांचे कट्टर समर्थक मांडल्या जाणार्या सात जेष्ठ शिवसैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांचे स्वागत केले. मनसेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. याचा मनसेला निवडणुकीमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. यामध्ये खैरे यांचे जवळचे सहकारी सुहास दशरथ यांनी आधीच मनसेत प्रवेश केला असून दशरथे सध्या औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. दशरथे ह्यांच्यामुळेच आता आणखी काही शिवसैनिक मनसेत दाखल झाले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी या सर्वांना संघटना वाढीसाठी काम करण्याच्या सूचना देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मनसेचे नेते अभिजीत पानसे देखील उपस्थित होते.
प्रणवदांनी संघाच्या व्यासपीठांवरून दिला होता ‘हा’ इशारा, सरसंघचालकांनीही पूर्ण केली होती इच्छा
त्यामुळे आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक २९ नगरसेवक आहे त्यानंतर भाजप २२, एम आय एम २५, काँग्रेस १०, राष्ट्रवादी ३, बसप ५, रिपब्लिकन पक्ष १, मनसेचा मात्र एकही नगरसेवक नव्हता त्यामुळे आता या पक्ष प्रवेशाचा मनसेला किती फायदा होतो हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
वैभव पिचड यांच्याकडून आढळा धरणाचे जलपूजन…


