Share

New Car Launch | Aston Martin ची ‘ही’ नवी कार बाजारात लाँच

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सगळीकडे स्पोर्ट्स कारचा ट्रेंड सुरू आहे. जगातील प्रसिद्ध स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी Aston Martin याच ट्रेंड चा फायदा घेत आपली नवीन स्पोर्ट्स कार लाँच केली आहे. कंपनीने आपले पावर फुल मॉडेल SUV DBX 707 देशात लाँच केले आहे. Aston Martin कंपनीचे हे आत्तापर्यंतचे सगळ्यात महाग मॉडेल आहे. या नव्या SUV च्या लूक,इंजिन, फीचर आणि किमती बद्दल जाणून घेऊया.

DBX 707 लूक

DBX 707 ही नवी SUV क्रोम-स्लॅटेड लार्ज ग्रिल, रुंद एअर डॅम, फ्लश-फिटेड डोअर हँडल, डकटेल स्पॉयलर, डिफ्यूझर, फ्रंट एअर स्प्लिटर, एलईडी हेडलाइट्स, इंडिकेटर-माउंटेड ORVM, इंटिग्रेटेड एलईडी टेललॅम्प्स, 22-इंच डिझाइनसह सुसज्ज आहे.

DBX 707 इंजिन

DBX 707 या नवीन SUV च्या इंजिन बद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये 4.0L, ट्वीन टर्बोचार्ड इंजिन उपलब्ध आहे. जे 707 hp पॉवर आणि 900Nm टार्क निर्माण करू शकते. या गाडीमध्ये 9-स्पीड वेट क्लच गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील-ड्राईव्ह सिस्टीम देखील आहे. ही SUV 310 किलोमीटर प्राति तास होऊ शकते.

DBX 707 फीचर

DBX 707 मध्ये आलिशान लक्झरी केबिन आहे. यामध्ये क्रोम फिनिशिंग सह स्विचगियर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड सीट्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, तीन प्रकारची अपहोल्स्ट्री, मल्टीफंक्शनल स्टिअरिंग व्हील या फीचरसह ही SUV सुसज्ज आहे.

DBX 707 किंमत

Aston Martin ची DBX 707 सर्वात महाग SUV आहे. या गाडीची एक्स-शोरुम किंमत 4.63 कोटी रुपये एवढी आहे. ही कार तुम्ही ऑनलाईन किंवा डीलरशिप द्वारे बुक करू शकतात. ही कार भारतीय कार लॅम्बोर्गिनी उरुस आणि फेरारी रोमा सारख्या कारशी स्पर्धा करेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!