Share

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत युझवेंद्र चहलनं निवड समितीला दिलं चोख उत्तर

Published On: 

🕒 1 min read

अबुधाबी : आयपीएलच्या 43 व्या सामन्यात आरसीबीने दमदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह बेंगळुरूने 14 गुण मिळवून अंतिम चार मधले स्थान जवळपास पक्केही केले आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

आरसीबीकडून नवोदित वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने अखेरच्या षटकात घेतलेले तीन बळी तसेच त्याला सुरेख साथ देताना यजुवेंद्र चहल व शाहबाज अहमदने केलेली अचूक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा डाव 20 षटकांत 9 बाद 149 धावांवर रोखला. रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चहलनं पुन्हा एकदा चांगली बॉलिंग करत ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार पटकावला. चहलनं 4 ओव्हर्समध्ये फक्त 18 रन देत 2 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी निवड केलेल्या खेळाडूंमध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहलचा समावेश करण्यात आला नाही. निवड समितीने त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष केले. मात्र, चहलनं यूएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत निवड समितीला चोख उत्तर दिलं आहे.

सेहवागनं देखील निवड समितीवर नाराजी व्यक्त केली होती. टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय टीममध्ये 5 स्पिनर्सचा समावेश करण्यात आला आहे. या टीममध्ये चहलच्या जागी राहुल चहरची निवड करण्यात आली आहे. यावर सेहवागने पुन्हा एकदा निवड समितीने चाहलचा विचार करावा असा सल्ला देखील दिला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!