औरंगाबाद : नाशिक येथे अतिशय थरारक अशी घटना घडली आहे.नाशिक येथील मिरची चौक येथे एका प्रायव्हेट लक्झरी बसचा टँकर सोबत भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही क्षणातच या बसने पेट घेतला आणि क्षणात या बसची राख झाली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अशातच या घटनेवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले ?
नाशिकमध्ये झालेला अपघात खड्ड्यांमुळेच झाला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील रस्त्यांची परिस्थिती या अपघातामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. रोज अपघातांसारखा जीवघेणा प्रकार सुरू आहे. हे सर्व पाप राज्यातील ईडीच्या म्हणजे भाजप प्रणित सरकारचं आहे.
महाविकास आघाडीच्या काळात झालेली कामे, बजेटमध्ये झालेली कामे बंद करून टाकली. काही कामांना स्थगित दिली. यामुळे कामे झाले नाहीत. कामेच बंद असल्याने रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे वाचवण्यासाठी हा प्रकार होतो आणि यामुळेच आता हा अपघात झाला असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. किती लोकांचा जीव राज्याचे ईडीचे भाजप प्रणित सरकार घेणार?, असा खोचक सवालही नाना पटोले यांनी याठिकाणी केला आहे.
दरम्यान, नाशिक येथील मिरची चौकात ही धक्कादायक घटना घडली असून, चिंतामणी ट्रॅव्हल्सची प्रायव्हेट लक्झरी बस मिरची चौकात असताना टँकरसोबत धडकली. यानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातानंतर बसने पेट घेतला. यामध्ये 10 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी अनेक प्रवाश्यांनी खडकीतून उडी मारुन त्यांचा जीव वाचवला. तब्बल अर्धा तास या गाडीने पेट घेतला.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात काळ्या पैश्यांचा पाऊस? हायकोर्टात मनी लाँड्रींगची याचिका दाखल; ईडी करणार का चौकशी?
- Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचा जोर कायम,तर मुंबईमध्ये आज ‘येलो अलर्ट’
- Nana Patole | “100 दिवसांत ‘ईडी’ सरकारने केवळ…”; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्ला
- Nashik Accident | नरेंद्र मोदींकडून आर्थिक मदतीचा हात; एकनाथ शिंदेकडून ‘इतक्या’ लाखांची मदत तर अमित शहा म्हणाले…
- BJP । “तुझं मुंडकं धडापासून…”; भाजप आमदाराला PFI कडून धमकी


