Share

Abu Azami | देशात नग्न फोटो शेअर केलेले चालतात, मग हिजाबलाच बंदी का?- अबू आझमी

Published On: 

सोलापूर: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतेच एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटवर सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. या फोटोंमध्ये रणवीर विना कपड्यांचा कार्पेटवर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये रणवीर झोपून पोज देत आहे, तर काही फोटोंमध्ये तो उभा राहून पोज देताना दिसत आहे. मात्र याच फोटोशूटमुळे आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याच मुद्द्यांवरून टीका केली.

देशात नग्न फोटोशूट केलेले चालते. ते फोटो शेअर केलेलेही चालतात. मग हिजाबलाच बंदी का?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. अबू आझमी म्हणाले कि, “आपल्या देशात एक महिला पुरुषासोबत लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहिलेली चालते. दोन पुरुष देखील एकमेकांसोबत लिव्ह इनमध्ये राहिलेले चालतात. एवढेच काय तर नग्न फोटो शेअर केलेलेही चालतात. मग हिजाबलाच विरोध का?” त्याचबरोबर हिजाब घातलेल्या महिला चोरी करतील, अशी भीती तुम्हाला वाटत असेल, तर तिथे महिला कर्मचारी ठेवा, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

तसेच त्यांनी यावेळी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावरूनही इतर सर्वच पक्षांवर निशाणा साधला. औरंगजेबाची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यासोबत केवळ राजकीय लढाई होती. त्यांच्यात धार्मिक लढाई नव्हती. मात्र आताचे हे नामांतर केवळ धार्मिकतेतून केले जात आहे, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच महाविकास आघाडी सरकारवरही केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!