Share

पुणे विभागात 10 हजार 41 स्थलांतरित मजुरांना निवारा तर 61 हजार 179 मजुरांना भोजनाची सोय

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 93 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 11 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 160 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 10 हजार 41 स्थलांतरित मजूर असून 61 हजार 179 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 902 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 94 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 548 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 1 हजार 41 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती देखील म्हैसेकर यांनी दिली.

मजुरांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे विभागात 16 मे 2020 रोजी 99.858 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.923 लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

उत्तर प्रदेशातील सुमारे बाराशे कामगार लखनौकडे रवाना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!