Share

मजुरांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

पश्चिम बंगाल : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. केंद्र सरकारने या जाहीर केलेल्या लॉकडाउनचा फटका देशभरातील कामगार आणि मजूर वर्गाला बसला. अखेरीस या कामगारांना आपल्या घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. त्यानंतर रेल्वे विभागाने या कामगारासांठी विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्याही सुरु केल्या.

मात्र कामगारांकडून घेतल्या जाणाऱ्या तिकीटांच्या पैश्यांवरुन मोठं राजकारण रंगताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कामगार व मजुरांकडून रेल्वे भाडं न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे.

# Lockdown 4 : देशात उद्यापासून नवा लॉकडाउन, जाणून घ्या कसा असेल चौथा टप्पा?

आपल्या ट्विटर खात्यावरुन ममता बॅनर्जी यांनी या निर्णयाबद्दलची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी कामगार व मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे घेण्यात आल्यानंतर केंद्राने तिकीटाची ८५ टक्के रक्कम रेल्वे मंत्रालय तर १५ टक्के रक्कम स्थानिक राज्य सरकार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र काही कामगारांनी आपल्याकडून रेल्वे तिकीटाचे पैसे घेतल्याचा आरोप केला होता.

आतापर्यंत पश्चिम बंगाल सरकारने देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी १०५ रेल्वे गाड्यांची सोय केल्याचं ममता दीदींनी सांगितलं. येत्या काळात गरजेनुसार अधिक गाड्यांची सोय केली जाईल असंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

माध्यम तुम्हला मोदी विरोधात बोलण्यास भाग पाडतील, पंतप्रधानांनी बॅनर्जींना केले सावध

#corona : कॉंग्रेसने सुचवलेल्या योजना उपयोगी, मोदी सरकारने त्या राबवाव्यात : अभिजित बॅनर्जी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!