🕒 1 min read
मुंबई : ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा’ असा सल्लावजा टोला सामनामधून भाजपला लगावला आहे.
दरम्यान,कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भाजपनेत्या शौमिका महाडिक यांनी या संदर्भात भाष्य केले आहे. राम मंदिर उभारणीसाठी योगदान द्यायला करोडो लोक उत्सुक आहेत. त्यांच्या भावनांचा आदर राखण्यासाठीच हा वर्गणीचा प्रपंच ! वर्गणी गोळा करणारेही रामभक्त व देणारेही रामभक्तच असतील.आता आमच्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वापासून कार्यकर्त्यांपर्यंत सारेच रामभक्त आहेत, त्याला आम्ही तरी काय करणार !असं त्यांनी म्हटलं आहे.
राम मंदिर उभारणीसाठी योगदान द्यायला करोडो लोक उत्सुक आहेत. त्यांच्या भावनांचा आदर राखण्यासाठीच हा वर्गणीचा प्रपंच ! वर्गणी गोळा करणारेही रामभक्त व देणारेही रामभक्तच असतील.आता आमच्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वापासून कार्यकर्त्यांपर्यंत सारेच रामभक्त आहेत, त्याला आम्ही तरी काय करणार !
— Shoumika Mahadik (@shoumikamahadik) December 21, 2020
तर दुसऱ्या बाजूला आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेवर तोफ डागली आहे. देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको! तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा असा टोला त्यांनी लगावला आहे.भातखळकर म्हणाले,ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत, त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते.
यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना चागलाच फैलावर घेतलं आहे. ‘लाज सोडली शिवसेनेनी… शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा’. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मालमत्ता खरेदीदारांना खुशखबर ! मुद्रांक शुल्कामधील सवलत चार महिन्यांनी वाढली…
- भारतात मुस्लिमांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा- साक्षी महाराज
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- ‘नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते’
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
