Share

भाजपला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Published On: 

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठा प्रमाणात पक्ष प्रवेश झाले होते मात्र आता सत्ता जाताच भाजपला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या शशिकांत चव्हाण यांनी आज पुन्हा हाती शिवबंधन बांधले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत एकेकाळी ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शशिकांत चव्हाण मध्यंतरी काही कारणामुळे भाजपात गेले होते. मात्र त्यांनी पुन्हा भाजपला रामराम करत शिवसेनेची वाट धरली. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शशिकांत चव्हाण स्वगृही परतले. शशिकांत चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. परंतु मध्यंतरीच्या काळात शिवसेनेपासून दूर जात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

ठाकरे सरकारच्या आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोनाची लागण

रामदास कदम यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत परतले. त्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा वाढल्याचे बोलले जाते. शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री मुंडेंच्या मागे ठामपणे उभे, कॉंग्रेसने व्यक्त केली तीव्र नाराजी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!