लातूर : उदगीर मतदरसंघाचे आमदार आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीने ते आजारी होते. कोरोनाची टेस्ट करण्यात आली त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळी ते सतत मतदारसंघात ठान माडून बसले होते. रुग्णालयात जाणाऱ्या कोरोना रुग्णांना ते धीर देत होते. या सतत च्या लोकसंपर्कामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 375799 वर गेली आहे. मृत्यूचा आकडा 13656 एवढा झाला आहे. मुंबईत एका दिवसात 1101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 109161 झाली आहे. राज्याचा सध्या मृत्युदर 3.63 टक्के एवढा आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56. 74 टक्के एवढे झाले आहे. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17738 एवढी झाली.
वेळेत चाचणी करून उपचार घेतल्यास मृत्यूदरात घट होईल – केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार
पुणे विभागातील 48 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 84 हजार 455 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 33 हजार 649 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 921 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी ग्रामोद्योगास चालना मिळणे आवश्यक : राज्यपाल


