Share

मुख्यमंत्री मुंडेंच्या मागे ठामपणे उभे, कॉंग्रेसने व्यक्त केली तीव्र नाराजी

Published On: 

नागपूर : शिवसेना खासदार आणि ”सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली गेली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी तम्पणे उभा असल्याचं बोलून दाखवल आहे.

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यातील संघर्षाची राज्यभरात चर्चा झाली. या संघर्षातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघी समोरासमोर आल्याचं चित्र दिसलं. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलं आहे तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरु आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशीही त्यांनी पंगा घेतलाय. तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की लोकनियुक्त महापालिकेच्या? असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना तुकाराम मुंढे शिस्तप्रिय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या, आ. किशोर जोरगेवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. त्यामुळे शिस्तीच्या मागे उभं राहणार’, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली ‘एखादा अधिकारी कठोर किंवा कडक असेल, पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्यापाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे’, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मात्र मुख्यमंत्र्यांचे मुंडेंच्या मागे ठामपणे उभे रहाणे शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसला रुचलेले दिसत नाही. तुकाराम मुंढे जे दाखवतात ते प्रत्यक्षात होतच नाही, असा आरोप काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. ही वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देणार असल्याचं विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या कौतुकामुळे भाजप घायाळ झाली आहे, तर काँग्रेसचे नेतेही नाराज झाले आहेत.

नाण्याची दुसरी बाजू आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू. लोकप्रतिनिधींचं कुठे चुकलं, जनतेचं कुठे चुकलं हे सगळं मुख्यमंत्र्यांसमोर ठेवू, तेव्हा त्यांच्या पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

तुम्ही कोरोनावर फोकस करा, बुलेट ट्रेन नागपुरलाही नेऊ ; भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!