टीम महाराष्ट्र देशा : येत्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण एकमेव असणारा आमदार देखील आता पक्षाला सोडचिठी देण्याच्या मार्गावर आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसे पक्षाकडून आमदार शरद सोनावणे निवडून आले होते पण आता शरद सोनावणे मनसेला सोडचिठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत.
शरद सोनावणे यांचे समर्थक आज मातोश्रीच्या अंगणात दाखल झाले व आज शरद सोनावणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसेची २०१४ च्या निवडणुकीत लाज राखणारा एकमेव उमेदवार आता शिवसेनेत जात असल्याने मनसेसाठी हा मोठा धक्काच असणार आहे.
तसेच जुन्नरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र शरद सोनावणे यांच्या पक्षप्रवेशावर आक्षेप घेतला असून जुन्नर मध्ये शिवसेना बाहेरचा उमेदवार स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

