मुंबई : गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सत्ताबदल झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकासाआघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. मात्र जे आमदार शिवसेनेतून फुटून शिंदेंसोबत गेले आमदारांनी थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आरोप केलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती नक्को म्हणून त्यांनी सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत पुन्हा युती केली. या आरोपांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलंय.
पवार म्हणाले कि, शिवसेनेच्या मतदारसंघात जाण्याचा आम्ही विचारही केला नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीने एकत्र लढावे अशी माझी इच्छा आहे. पण मी हे अजून माझ्या पक्षात बोललो नाही आणि काँग्रेससोबतही बोललो नाही. मध्यावधी निवडणुका होतील असं मी म्हणालोच नव्हतो. फक्त कामाला लागा असं सांगितलं होतं. बंडखोरीच्या निर्णयाला काहीही आधार नाही. लोकांना काहीतरी सांगायचं म्हणून सांगत आहेत, अशी टीकाही पवार यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर केलीय. ते आज औरंगाबादेत बोलत होते.
दरम्यान, दहिसरमध्ये आज बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारांना जर परतयाचे असेल तर अजूनहि मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी मातोश्रीवर यावे असे आवाहन केले आहे. शिवसैनिक नेहमीच मातोश्रीवर येतात, त्यांना परतायचे आहे, त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल. तसेच ज्यांना तिथे राहायचे असले, त्यांनी हिंमत असेल तर निवनडणुकांना सामोरे जावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

