पुणे : पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आणि माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचे कोरोना विषाणूची बाधा झाल्याने उपचारा दरम्यान शनिवारी निधन झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वर्गीय दत्ता साने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस करत सांत्वन केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. साने हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते. अनेकदा त्यांना दुसऱ्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते.
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे साने यांना मानले जात होते. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर २२ जून रोजी दत्ता साने यांचा स्वॅब घेतला होता, दोन दिवसानंतर ते कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर तातडीने खासगी रुगणलायत उपचार सुरू केले. परंतु. त्यांना न्यूमोनिया, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याने प्रकृती खालावत गेली. शेवटच्या क्षणी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता अशी माहिती समोर आली होती. कोरोनाशी लढा देत असताना नगरसेवक दत्ता साने यांचा उपचारा दरम्यान शनिवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले.
शरद पवार याच्या सोबत यावेळी साने कुटुंबातील सदस्य, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल उपस्थित होते.
दत्ता साने चिखली परिसरातून तीन वेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. महापालिकेत विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. आक्रमक, परखड असे ते व्यक्तिमत्व होते.
कोरोनामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचं निधन, राहुल गांधींना शोक अनावर
याला म्हणतात माणुसकी ! गौतम गंभीरने घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः केले अंत्यसंस्कार
शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेला कॉंग्रेसचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

