Share

याला म्हणतात माणुसकी ! गौतम गंभीरने घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः केले अंत्यसंस्कार

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. 3 मे पर्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. त्याचवेळी मोदींनी स्वतःची, कुटुंबाची तसेच कामगारांची काळजी घेण्यास सांगितले आहे. तर अडचणीत असणाऱ्यांना मदत करावे, असे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदींच्या याचं आवाहनाचे पालन करत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा भाजप खा. गौतम गंभीर याने केले आहे. गौतम गंभीरच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेचे नुकतेच निधन झाले. याची माहिती गंभीरनं ट्विटरवरून दिली. इतकेच नाही, तर गंभीरनं घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः अंत्यसंस्कार केले.

‘आज तक’ च्या वृत्तानुसार या महिलेचे नाव सरस्वती पात्रा होते आणि ती ओडिशाची होती. सरस्वतीला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. तिला काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 21 एप्रिलला तिचे निधन झाले.

गंभीरनं ट्विट केलं की,”ती आमच्या कुटुंबाची सदस्य होती आणि तिचे अंत्यसंस्कार करणे ही माझी जबाबदारी होती. जात, धर्म, धर्म किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार मी करत नाही. चांगला समाज निर्माण करण्याचा हाच मार्ग आहे.. ओम शांती.”
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी गंभीरनं नवी दिल्ली सरकारला 50 लाखांची मदत केली. शिवाय त्यानं दोन वर्षांचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!