Share

चव्हाण अडकले कोरोनाच्या विळख्यात, ‘या’ मराठी नेत्यांना देखील झाली होती कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. त्यातच आता ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. रविवारी त्यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईत अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.

अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला आणलं जात असून या प्रवासासाठी १२ तास लागणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांच्यावरील पुढील उपचाराला सुरुवात होईल. दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्री कोरोनाग्रस्त होण्याची ही पहिली घटना नाही. याआधी राज्याचे बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड हे सुद्धा कोरोनाग्रस्त झाले होते. गेले काही दिवस ते रुग्णालयात होते. आव्हाड हे नुकतेच कोरोनावर मात करून आले आहेत.

मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजमधून घोर निराशा झाली : पृथ्वीराज चव्हाण

आव्हाड यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना वस्तुस्थिती मांडली होती. यावेळी कोणत्या आव्हांना समोरे जावे लागले आणि तो अनुभव कसा होता. कुटुंबावर काय परिस्थिती आली होती. हा सारा अनुभव जितेंद्र आव्हाड यांनी दै. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. यावेळी त्यांनी मी मृत्यूच्या दाढेतून उमेद घेऊन परतलोय, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर अतिआत्मविश्वास आणि बेफिकरी भोवली असल्याचं ही ते म्हणाले.

याशिवाय माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील करोनावर मात केली आहे. नुकताच त्यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनल यांना मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आनंद परांजपे हे करोना बाधिताच्या संपर्कात आल्यानं त्यांना लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीला संसर्ग झाला. त्या दोघांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांच्यावर ठाण्यातील होरायझन रुग्णालयात उपचार सुरू होते.

5 वर्षाच्या विहानने केला एकट्याने दिल्ली ते बंगरूळ असा विमान प्रवास

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!