Share

शरद पवार होणार भारताचे राष्ट्रपती ? ; मोर्चेबांधणीला सुरुवात

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचा चेहरा करण्यासाठी राजकीय रणनितीकर प्रशांत किशोर यांनी देशभरात मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. ते सध्या देशभरातील दिग्गज नेत्यांच्या बैठका घेत आहेत. नुकतीच त्यांनी काँग्रेससोबतही याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला धक्का देण्यासाठी प्रशांत किशोर रणनिती आखत असल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे.

सध्याच्या घडीला प्रशांत किशोर यांनी सध्या देशातील विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी बैठकांचा सपाटा लावला आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली, तर त्या आधी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. शरद पवार यांना येत्या राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांचा चेहरा करण्यासाठी ही मोर्चेबांधणी चालू असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

एकंदरीतच प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 2022 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामुळे पुढील वर्षभरात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. यासाठी प्रशांत किशोर यांनी भाजप विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांचे नाव पुढे केल्याचे माहिती अनेक राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची तीन वेळा भेट घेतली आहे. यापैकी एका बैठकीला पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही हजेरी होती. त्यामुळे शरद पवार विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचा चेहरा असतील असं निश्चित मानलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!