टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने एकही उमेदवार न देता पंतप्रधान मोदी आणि भाजप विरोधात जोरदार प्रचार केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक ठिकाणी सभा घेत मोदींच्या भाषणाची पोलखोल केली. आता राज्यातील सर्व मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर मनसेच्या सभांचा हिशोब निवडणूक आयोगाने घ्यावा, अशी मागणी भाजप नेते करत आहेत. निवडणूक आयोगाने देखील मनसेला नोटीस पाठवण्याची हालचाल सुरु केल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंची पाठराखण केली आहे. मनसेने लोकसभेसाठी उमेदवारच न दिल्याने निवडणूक आयोगाला त्यांना हिशोब मागण्याचा अधिकार नाही. एखाद्या पक्षाने कोणताही उमेदवार उभा न करता सभा घेतल्या तर तो त्याचा लोकशाही अधिकार असल्याचं पवार म्हणाले
आणीबाणीनंतरच्या निवडणुकीचा दाखला देत शरद पवार म्हणाले की, पू ल देशपांडे आणि इतर काही लोकांनी १९७७ साली आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत कॉंग्रेस विरोधात प्रचार केला होता. उमेदवार उभा न करता पुलंनी सभा घेतली म्हणून आयोगाने त्यांना खर्च मागितला नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

