टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन केलं आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिक काढून विक्रीस तयार असताना ते बाजारात नेण्यास अडचणी येत आहेत.
आता विदर्भातील अश्या शेतकऱ्यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार धावून आले आहेत.केंद्रिय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना शरद पवार यांनी विनंती केली आहे की’
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्याने नागपूर, चंद्रपूर भांडारा आणि इतर जिल्ह्यांत धान खरेदीची मुदत ४ ते ५ आठवड्यांची मुदत वाढवावी, अशी मागणी त्यांनी पासवान यांच्याकडे केली आहे.कोरोनामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता शरद पवारांच्या विनंतीनंतर केंद्रिय मंत्री पासवान काय पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Due to the #Coronavirus #lockdown in Maharashtra, request Hon. Ram Vilas Paswan (@irvpaswan) to extend the date of procurement of Paddy from farmers in Nagpur, Chandrapur, Bhandara, Gondia and surrounding areas by 4 – 6 weeks.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 24, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

