Share

प्रधानमंत्री कार्यालयातील ‘हिंदुत्व विरोधी’ लोकं शरद पवारांच्या संपर्कात : सुब्रमण्यम स्वामी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.शरद पवार यांनी प्रधानमंत्री कार्यालयात खुसाखोरी केली आहे.आणि त्या कार्यालयातील हिंदुत्व विरोधी असणारे लोकं शरद पवारांच्या संपर्कात आहेत.स्वामींनी पंतप्रधान कार्यालयासंबंधातच दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान कार्यालयात हिंदुत्व विरोधी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे आणि हे अधिकारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप सुब्रम्हण्याम स्वामी यांनी केलाय. देशभर सीएए विरोधी वातावरण आणि दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

हिंदुत्व मानसिकता विरोधी हे अधिकारी देशभक्त अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणत आहे. हे देशभक्त अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करू इच्छितात. मात्र त्यांना कारवाई करू दिली जात नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऑफिस हे देशातलं सर्वात शक्तिशाही ऑफिस आहे असं असजलं जाते. मोदींची प्रशासनावर जरब आहे असंही मानलं जाते. त्यांचा मंत्र्यांपेक्षा अधिकाऱ्यांवरच प्रचंड विश्वास आहे अशी टीकाही केली जाते. या पार्श्वभूमीवर सुब्रम्हण्यम स्वामी यांनी असा दावा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

प्रत्येक मंत्रालयाच्या सर्व महत्त्वाच्या फाईल्स या पंतप्रधान कार्यालयाकडे येत असतात. धोरणात्मक निर्णय घेतानाही पंतप्रधान कार्यालयाचा सल्ला सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्वामींच्या या आरोपाने दिल्लीच्या राजकीय आणि प्रशासनिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.एकंदरीतच शरद पवारांच्या कार्य करणाच्या पद्धतीने स्वामींचा आरोप खरा आहे ,असेच वाटू शकते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!