दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. त्यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुले राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या असतानाच काल ( २१ जून ) रोजी पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. पवार-किशोर यांची ही दुसरी भेट असून या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर खलबतं झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, या भेटीनंतर भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती आखत असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
आता शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आज ( २२ जून ) ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी काँग्रेस वगळून इतर विरोधी पक्षांना आमंत्रित करण्यात आलंय. यजमान म्हणून शरद पवार हेच या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत.
मात्र, बैठकीपूर्वी ‘ही बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नसल्याचं’ स्पष्टीकरण देण्यात आलंय. तर या बैठकीत राजकीय नेत्यांव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील इतर काही प्रसिद्ध व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आलंय. दुसरीकडे या बैठकीत कॉंग्रेसचा एकही नेता सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘राष्ट्र मंच’च्या छत्राखाली होत असलेली ही बैठक कॉंग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची चाचपणी असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिक्षा चालक ते रिअल इस्टेट किंग…अविनाश भोसले यांचा थक्क करणारा प्रवास
- ‘मेरे दो अनमोल रतन’; प्राजक्ता माळी भाच्यांसोबत घालवते सुट्टीचा आंनद
- कोरोना संसर्गाच्या साथीत ऑलिम्पिक स्पर्धेत ‘कंडोम’ वाटपाचा अट्टहास
- अखेर अॅडम झाम्पा बोहल्यावर चढला; कोरोनामुळे रखडला होता विवाह
- हॅटट्रिक घेणारा केशव महाराज ठरला दुसरा दक्षिण अफ्रिकन क्रिकेटपटु

