मुंबई : सेंट लुशीया येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजचा १५८ धावांनी पराभव केला आहे. दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या ३२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ १६५ धावांची मजल मारु शकला. या सामन्यासह दक्षिण अफ्रिकेने २ कसोटी सामन्याची मालिकाही २-० अशी खिशात घातली आहे.
या सामन्यात केशव महाराजाने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधिक ५ गडी बाद केले. या सामन्याला कलाटणी मिळाली ती ३७व्या षटकात. या षटकात महाराजाने कायरान पॉवेल(५१), जेसन होल्डर(०) आणि जोशुआ डी सिल्व्हा(०) या तीन फलंदाजाना बाद करत हॅटट्रिक नोदंवली. यासह केशव महाराजा कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा दक्षिण अफ्रिकेचा केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. तर अशी कामगीरी करणारा तो पहिलाच फिरकीपटु ठरला आहे.
https://twitter.com/Vaccinate_All/status/1407037666101809153
यापुर्वी १९६० साली जिऑफ ग्रिफीन या वेगवान गोलंदाजाने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडुन पहिलीवहिली हॅटट्रिक नोदंवली होती. त्यासामन्यात ग्रिफीनने ट्रेव्हर ग्रिपर, मुरी गुडविन आणि निल जॉन्सन या खेळाडूंना लागोपाठ तीन चेंडुवर बाद केले होते. यानंतर तब्बल ६१ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या हॅटट्रिकची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्युटीसी फायनल! सामन्याचा चौथा दिवस वरुणदेवाच्या कृपेमुळे स्वाहा..
- डब्ल्युटीसी फायनल! आयसीसीच्या नियोजनावर सेहवागची टिका
- महाराजाच्या हॅटट्रिकमुळे दक्षिण अफ्रिकेची वेस्ट इंडिजवर १५८ धावांनी मात
- डब्ल्युटीसी फायनल! ‘इंग्लंडमध्ये यापुढे महत्वाचे सामने नकोच’, पिटरसनने व्यक्त केला संताप
- कृषि अधिकाऱ्यांकडून निलंगा येथे पिकांची पाहणी; आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दिल्या सूचना

