मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटु आणि आयपीएलमध्ये आरसीबी संघाचे प्रतिनिधीत्व करणारा अॅडम झाम्पाचे लग्न कोरोना संसर्गामुळे दोन वेळेस रद्द झाले होते. मात्र अखेर तो विवाहबंधनात अडकला आहे. मागील आठवड्यात त्याने त्याची मैत्रीण हॅटी पार्मरसोबत लग्न केले आहे.
गेल्या एक दिड वर्षापासुन जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे जनजिवन ठप्प झाले होते. तसेच अनेक सामाजीक कार्यक्रम, सोहळे आणि क्रिडा स्पर्धेवर बंधने आली होती. कोरोनच्या या संसर्गामुळे ऑस्ट्रेलियन फिरकीपटु गोलंदाज अॅडम झाम्पाचे लग्न दोन वेळेस रद्द झाले होते. मात्र अखेर त्याचा विवाह पार पडला आणि तो बोहल्यावर चढला. मागील आठवड्यात अॅडम झाम्पा आणि त्याची मैत्रीण हॅटी पार्मर दोघेही विवाह बंधनात अडकले.
२०१७ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत हॅटी अॅडमसोबत भारतात आली होती. या स्पर्धेत अॅडम हा पुणे सुपर जायंटकडुन खेळत होता. त्यावेळी या दोघांनी सोशलमीडीयावर अपशब्दांचा वापर केल्यामुळे ते दोघेही ट्रोलझाले होते. ऑस्ट्रेलिया सघांच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात अॅडम झाम्पा दिसु शकतो. यदांच्या आयपीएलमधुन त्याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना- भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको – चंद्रशेखर बावनकुळे
- डब्ल्युटीसी फायनल! सामन्याचा चौथा दिवस वरुणदेवाच्या कृपेमुळे स्वाहा..
- डब्ल्युटीसी फायनल! आयसीसीच्या नियोजनावर सेहवागची टिका
- महाराजाच्या हॅटट्रिकमुळे दक्षिण अफ्रिकेची वेस्ट इंडिजवर १५८ धावांनी मात
- डब्ल्युटीसी फायनल! ‘इंग्लंडमध्ये यापुढे महत्वाचे सामने नकोच’, पिटरसनने व्यक्त केला संताप

